गुरूवार, 6 मार्च 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 मार्च 2025 (15:02 IST)

विधानसभेतून निलंबित केल्यावर अबू आझमी यांनी दिली प्रतिक्रिया

abu azmi
औरंगजेबच्या समर्थनार्थ विधानावरून अबू आझमी वादाच्या भोवऱ्यात अडकले असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहे.  सध्या त्यांच्या या विधानावरून महाराष्ट्रात राजकारणात गोंधळ सुरु आहे. 
त्यांच्या या विधानावरून अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशना पर्यंत विधानसभेतून निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी अलीकडेच औरंगजेबाच्या समर्थनार्थ एक विधान केल्यामुळे राज्यात त्यांच्या विरुद्ध तीव्र विरोध झाला.

त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.शिवसेना देखील अबू आझमी यांच्या निलंबनावर ठाम होती. त्यांचे विधानसभा अध्यक्षांनी अधिवेशनापर्यंत निलंबन केले आहे. 
निलंबनानंतर अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अबू आझमी म्हणाले, 'विधानसभा सुरू राहावी म्हणून मी जे बोललो ते मागे घेईन असे म्हटले होते. मी काहीही चूक केलेली नाही. असे असूनही, सुरू असलेले वादळ आणि विधानसभा थांबवली जात आहे. विधानसभेचे कामकाज चालले पाहिजे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात काही काम झाले पाहिजे. मी विधानसभेच्या बाहेर जे काही बोललो ते विधान मी परत घेण्याबद्दल देखील बोललो. 
तरीही मला निलंबित करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेने सपा आमदार अबू असीम आझमी यांचे सभागृहाचे सदस्यत्व चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरीपर्यंत निलंबित केले आहे.
Edited By - Priya Dixit