बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2023 (13:46 IST)

Accident : पंढरपूर वरून परतणाऱ्या भाविकांवर काळाची झडप, 3 ठार 7 जखमी

accident
Shegaon Accident : पंढपूर येथून देवदर्शन करून परत येतांना भाविकांच्या वाहनावर काळाने झडप घातली या अपघातात 3 भाविकांचा मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींची प्रकृती गंभीर आहे. पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी गेले असता परत येताना शेगावात मोठा अपघात घडला.

आज सकाळी सहाच्या सुमारास शेगावच्या प्रवेश द्वाराजवळ भाविकांना घेऊन येणाऱ्या वाहनांची धडक स्वागत फलकाच्या पिलरवर धडकून अपघात झाला. या अपघातात 3 भाविक जागीच ठार झाले तर 7 भाविक गंभीर जखमी झाले. जखमींना नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.वाहन चालकाला झोप आल्यामुळे हा अपघात घडला. शेगावात देशमुख पेट्रोल पंपावर वाहनाची धडक पिलरला होऊन हा अपघात झाला.घराच्या अवघ्या दोन किमी दूर असताना हा अपघात घडला.   

Edited by - Priya Dixit