बुधवार, 6 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (10:02 IST)

Accident : देवदर्शन वरून परतताना अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

accident
उमरगा :श्रावण सोमवारच्या निमित्ताने देवदर्शन आटोपून गावाकडे परतणाऱ्या आटोला ट्रकची धडक होऊन अपघात झाल्याची घटना सोलापूर हैद्राबाद मार्गावरील मन्नाळी येथे घडली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. कर्नाटकातील अमृतकुंड येथून देवदर्शन आटोपून उमरगा तालुक्यातील सुंदरवाडीचे राहणारे सुनील महादेव जगदाळे हे आपल्या आई, पत्नी, मुलगी, भाची आणि इतर दोघांना घेऊन श्रावणी सोमवार असल्यामुळे आटोरिक्षातुन हे साती जण कर्नाटकातील बसवकल्याण तालुक्यात अमृतकुंड दर्शनासाठी गेले होते. परतताना सोलापूर- हैद्राबाद महामार्गावर मन्नाळी कॉर्नर वर यांच्या आटोला ट्रक ने  पाठीमागून जोरदार धडक दिली.आटो दुभाजकावर चढून पालटला .या अपघातात प्रमिला सुनील जगदाळे या रस्त्यावर पडल्या आणि ट्रकच्या खाली चिरडल्या गेल्या त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तर सुनील जगदाळे, अनुसया महादेव जगदाळे, पूजा विजय जाधव, यांचा मृत्यू झाला. तर गीता शिवराम जगदाळे , लक्ष्मी सुनील जगदाळे, अस्मिता शिवराम जगदाळे या गंभीर जखमी झाल्या. यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.    

अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. अपघाताची माहिती मिळतातच बसवकल्याणचे आमदार शरणु सलगर यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अपघाताची नोंद घेऊन  मृतदेह ताब्यात घेतले आहे आणि जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 

या अपघातात सुनील जगदाळे आणि त्यांची पत्नी प्रमिला जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे. या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी असून आई वडील अपघातात मरण पावल्याने ते पोरके झाले आहे. 
 
Edited by - Priya Dixit