रविवार, 3 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 29 ऑगस्ट 2023 (07:25 IST)

Road Accident: इराकमध्ये भीषण रस्ता अपघात, बसची ट्रकला धडक; 9 इराणी यात्रेकरू ठार

accident
इराकच्या दक्षिणेकडील नासिरिया शहरात बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात नऊ इराणी यात्रेकरू जागीच ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. एएनआय या वृत्तसंस्थेने रॉयटर्सच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. ही घटना दक्षिण इराकच्या नासिरिया शहरात घडली . बसमधील सर्व प्रवासी यात्रेला जात होते.इराणमध्ये राहणारे हे सर्व यात्रेकरू बसने शिया मुस्लिमांचे पवित्र शहर करबला येथे जात होते. यादरम्यान प्रवाशांनी भरलेली बस एका ट्रकला धडकली. 
 
बस करबला या पवित्र शिया मुस्लिम शहराकडे निघाली होती . रॉयटर्सने वैद्यकीय सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, या अपघातात मुलांसह 31 जण जखमी झाले असून त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.
 
 
Edited by - Priya Dixit