मंगळवार, 5 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जुलै 2023 (10:42 IST)

Buldhana Bus Accident: बुलढाण्यात दोन ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात, 6 प्रवाशांचा मृत्यू

accident
बुलढाण्याच्या मलकापूर शहरातील हायवे क्रमांक 6 वरती दोन ट्रॅव्हल बसची जोरदार धडक होऊन अपघात झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या अपघातात 6 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अमरनाथ येथून 35 ते 40 प्रवाशांना घेऊन खासगी बस  हिंगोलीच्या दिशेने निघाली होती. तर विरुद्ध दिशेने नागपूरहून 25 ते 30 प्रवाशांची बस येत होती. या दोन्ही बसची धडक समोरासमोर झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही बसचा चक्काचूर झाला आहे. तर सहा प्रवाशी जागीच ठार झाले. दोन्ही बस मधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहे. 

अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बचाव कार्य सुरु करून जखमींना रुग्णालयात वेळीच रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे आपल्या पोलीस वाहनातून रुग्णालयात उपचारासाठी  पाठविले. काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वृत्त आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 
या महिन्याभरात बुलढाण्यात खासगी बसचा दुसरा अपघात आहे. या अपघातामुळे खळबळ उडाली आहे. 
Edited By - Priya Dixit