सोमवार, 14 ऑक्टोबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (17:53 IST)

Chamba Road Accident: पोलिसांची व्हॅन नदीत कोसळली, पाच ठार

accident
Chamba Road Accident:हिमाचलच्या चंबाच्या तीसा बैरागढ रोडवरील तरवाई पुलाजवळ एक टाटा सुमो अनियंत्रित अनेक फूट खोल बैरा नदीत कोसळली, त्यात पाच पोलीस कर्मचारी आणि चालकाचा मृत्यू झाला. तर पाच जखमीं झाले आहे. जखमींमध्ये चार पोलिस कर्मचारी आणि एक स्थानिक व्यक्तीचा समावेश  आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली.
 
स्थानिक लोकांव्यतिरिक्त तीसा पोलिस स्टेशनचे पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्यात गुंतले. जखमींना नदीतून बाहेर काढून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल तिसा  येथे पाठवण्यात आले आहे. या घटनेत ठार झालेले आणि जखमी झालेले पोलीस कर्मचारी सीमाभागात गस्तीसाठी गेले होते.
 
जेव्हा पोलिस कर्मचारी टाटा सुमोमध्ये पेट्रोलिंगसाठी जात होते. टाटा सुमो वाहन तारवई येथे येताच अचानक डोंगरावरून वाहनावर मोठी  दरड कोसळली.त्यामुळे वाहनाचे नियंत्रण सुटून वाहन बैरा नदीत पडले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून बचावकार्य करण्यात आले.
 
तीसा बैरागढ रोडवर शनिवारी सकाळी झालेल्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर काही पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये चालकासह एक ग्रामस्थही आहे. जखमींना उपचारासाठी तिसा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 



Edited by - Priya Dixit