बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑगस्ट 2023 (17:27 IST)

Moradabad : मुरादाबादमध्ये भाजप नेते अनुज चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या

crime
Moradabad Murder News : भाजप नेते आणि असमोली ब्लॉक प्रमुख पदाचे उमेदवारअनुज चौधरी (वय 35)यांची गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता न्यू मुरादाबाद येथील पार्श्वनाथ प्रतिभा सोसायटीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या डोक्यावर, खांद्यावर आणि पाठीवर चार गोळ्या लागल्या. ते त्यांच्या मित्रांसह फिरत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे समजले. 

नातेवाइकांनी अस्मोली गटप्रमुखाचे पती व मुलासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संभल जिल्ह्यातील एकोडा कंबोह पोलीस स्टेशन हद्दीतील आलिया नेकपूर येथील रहिवासी अनुज चौधरी माझोला परिसरातील पार्श्वनाथ प्रतिभा सोसायटीमधील टॉवर टी-7 मधील मध्ये राहत होते . त्यांनी अस्मोली गटप्रमुखपदाची निवडणूक लढवली.
 
त्यांना संभळ पोलिसांकडून सरकारी गनर मिळाले होते . अनुजने दोन खासगी गनर देखील आपल्या संरक्षणात ठेवल्या होत्या. दररोजप्रमाणेच सायंकाळी सहा वाजता अनुज हे आपले  मित्र पुनीत रा. संभळ याच्यासोबत सोसायटीत फिरत होते. चालत चालत ते  गेट नंबर एक समोरच्या रस्त्यावर पोहोचले . यादरम्यान मागून दुचाकीवर तीन हल्लेखोर आले. बाईक चालवणार्‍या हल्लेखोराने हेल्मेट घातले होते. तर पाठीमागे बसलेले दोन्ही हल्ल्लेखोर तसेच होते . तिघांनी पिस्तुल घेऊन अंदाधुंद गोळीबार केला. डोक्यात, पाठीवर आणि खांद्याला गोळी लागल्याने अनुज जागीच पडले , तर त्यांचे मित्र  पुनीत जीव वाचवण्यासाठी उद्यानाकडे धावले  असता, बदमाशांनी त्याच्यावरही गोळीबार केला, त्यात ते  जखमी झाले. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक आपल्या फ्लॅटमधून बाहेर आले तेव्हा गेट क्रमांक एकमधून हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी तातडीनं अनुज यांना  रुग्णालयात पाठवले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 
 
घटनेच्या वीस मिनिटे आधी तीन मारेकरी गेट क्रमांक दोनमधून आत शिरल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. गेटवर उपस्थित असलेल्या रक्षकांनी त्यांना आत जाण्यापासून रोखले नाही आणि रजिस्टरमध्ये त्यांची कोणतीही नोंद केली नाही.पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 







Edited by - Priya Dixit