1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 जुलै 2023 (13:13 IST)

बांगलादेशी तरुणीने प्रेमासाठी भारतातील तरुणाला सोबत नेले, पुढे हे घडलं

love hands
पाकिस्तानची सीमा आणि नोएडातील सचिनच्या प्रेमकहाणीची चर्चा सर्वत्र सुरु असता आता मुरादाबादमध्येही असेच एक प्रकरण समोर आले आहे. भोजपूरच्या बिजना गावात राहणारी सुनीता पत्नी रामचंद्र आपल्या कुटुंबासह सिव्हिल लाइन्सच्या गौतम नगर नया गावात भाड्याच्या घरात राहते. सुनीताला दोन मुली आणि तीन मुलगे आहेत. सुनीताने सांगितले की, मोठा मुलगा अजय हा टॅक्सी ड्रायव्हर आहे. दोन वर्षांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून त्याची बांगलादेशातील गाझीपूर येथील रहिवासी असलेल्या जुलीशी मैत्री झाली. दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेतले होते. यानंतर दोघेही बोलत होते. 
 
येथे राहणारा टॅक्सी चालक अजय सैनी आणि बांगलादेशातील ज्युली यांची फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली. पुढे त्यांचे प्रेम प्रकरण सुरु झाले. ज्यूलीने अजय ला सांगितले की ,ती पतीच्या निधनानंतर आपल्या 11 वर्षाच्या मुली सोबत राहते. भाडयाच्या घरातून तिचे घर चालते.  त्यांना एकमेकांशी लग्न करायचे होते. 2022 मध्ये ज्युली आपल्या 11 वर्षाच्या मुलीला घेऊन अजयच्या घरी आली. तिने मुस्लिम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारला आणि अजयशी लग्न केले. आणि जुही नाव केले. नंतर अजयची आई या लग्नामुळे रागावली होती. नंतर अजय ज्यूलीला आईजवळ सोडून कामाच्या निमित्ताने कर्नाटकात गेला. इथे आई आणि ज्युली मध्ये सततचे वाद होत होते. रागाच्या  भरात येऊन ज्युली बांगलादेशला परत गेली. काही दिवसानंतर अजय ने फोन वरून जुहीशी संभाषण केले .अजय मुरादाबाद आल्याचे समजल्यावर जुही देखील परत आली .
 
तीन महिन्यांपूर्वी ज्युली अजयला विना पासपोर्टच्या घेऊन बांगलादेशला गेल्याचा आरोप केला आहे. सुनीताने सांगितले की, सुमारे तीन महिन्यांपूर्वी ज्युलीने तिचा व्हिसा संपणार असल्याचे सांगितले. व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी बांगलादेशला जाण्याबाबत ती बोलू लागली. त्याने अजयला बांगलादेश सीमेपर्यंत सोडण्यास सांगितले. यानंतर ती व्हिसाची मुदत वाढवून परत येईल. 
 
अजय बांगलादेश सीमेवर भाड्याच्या खोलीत राहू लागला. नंतर पावसात अजय पडला आणि त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. अजयने रक्तबंबाळ अवस्थेत व्हॉट्सअॅपवर फोटो पाठवून आईला ला पैसे पाठवण्यासाठी मदतीची विनंती केली आहे.प्रेयसीच्या कैदेत अडकलेल्या अजयने बांगलादेशातून आईला फोन करून तिला कसेतरी वाचवण्याची विनंती केली आहे. अजय त्याच्या आईला म्हणाला- आई, मी तिला घरी यायला सांगितल्यावर ज्युली तिला मारते. 
 
सुनीताने सांगितले की, 15 दिवसांनी तिच्या मुलाने फोन करून सांगितले की, सीमेवर काही रुपये खर्च करून ज्युली मला बांगलादेशात घेऊन आली आहे. तो पंधरा दिवसांनी येईल. तेव्हापासून अजयचा कुटुंबाशी संपर्क झालेला नाही. आता त्याने तिथल्या एका नंबरवरून त्याचे फोटो अजयला पाठवले आहेत. ज्यामध्ये तो रक्तबंबाळ अवस्थेत दिसत आहे. त्यांनी मदतीची याचना केली आहे. 
 
सुनीताने एसएसपी कार्यालयात अर्ज देऊन आपल्या मुलाला बांगलादेशातून परत आणण्याची विनंती केली आहे. एसएसपीने सिव्हिल सीओ सिव्हिल लाइन्स आणि एलआययूला संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
 
 
 Edited by - Priya Dixit