रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 30 जुलै 2023 (15:39 IST)

Yavatmal Accident : भरधाव ट्रकची कारला धडक, एकाचा मृत्यू

accident
यवतमाळ येथे नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर तपासणी करणाऱ्या हायवे पोलिसांच्या वाहनाला भरधाव ट्रक ने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात कर्तव्य बजावत असलेल्या  पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले. 
 
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर कोसदणी घाटात हा अपघात झाला. महामार्ग पोलीस मध्यरात्री ट्रक थांबवून वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करत असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक ने पोलिसांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. 

या वेळी तपासणीसाठी रस्त्यावर उभा असलेला पोलीस कर्मचारी ट्रक आणि आयशरच्या मध्ये चिरडला गेला. आणि अपघातात पोलीस कर्मचारी आणि आयशरच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला. संजय नेटके असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तर दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन तपास सुरु केला आहे. 
 
Edited by - Priya Dixit