1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 जुलै 2023 (15:28 IST)

Nagpur : महिलेच्या स्कूटीच्या हेडलाईट मधून निघाला साप

snake
सापाचं नाव जरी आलं की अंगाचा थरकाप होतो. साप जवळ आला की काय होणार ह्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. सध्या पावसाळा सुरु आहे. जमिनीत पावसाचं पाणी मुरतं आणि जमिनीतून बाहेर साप निघणं सहज आहे. या दिवसांत जमिनीच्या खाली राहणारे प्राणी नवीन आणि कोरड्या जागेच्या शोधात असतात. मग त्यांना जी जागा मिळेल ते जाऊन राहतात. घरात या दिवसांत साप निघणे शक्य आहे. पण साप जर वाहनात जाऊन बसला असेल तर काय. असे काहीसे घडले  आहे नागपुर येथे.

वाहनाच्या हेडलाईट मध्ये साप जाऊन बसला.ही बाब कळतातच सर्पमित्राला बोलवून त्याला बाहेर काढले. सीमा धुळसे ही महिला मंगळवारी दुपारच्या वेळी प्रधानमंत्री आवास योजना इमारत वाठोडा येथे बँक योजनेच्या वसुलीच्या कामा साठी आलेल्या होत्या. त्यांनी इमारतीच्या पार्किंग मध्ये गाडी लावली आणि वसुलीसाठी गेल्या. परत आल्यावर त्यांनी वाहन सुरु केले तर त्यांना गाडीच्या हेडलाईटच्या गॅप मध्ये सापाची शेपूट दिसली. त्यांनी तातडीनं गाडी थांबवली आणि सर्पमित्राला फोन करून माहिती दिली.     

सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले.साप गाडीत लपून बसला होता त्यामुळे त्याला शोधणे कठीण होत होते. नंतर गाडीला उघडून सापाला बाहेर काढले. सापाला बाहेर काढण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 
 



Edited by - Priya Dixit