सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑक्टोबर 2019 (16:25 IST)

राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीचा शनिवारी दुपारी दरम्यान लोणावळ्याजवळ अपघात झाला आहे. या अपघातात राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि बहीण किरकोळ जखमी झाल्या आहेत. घरी परतत असताना हा अपघात झाला आहे.राज ठाकरे सहपरिवार लोणावळ्याच्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. 
 
यावेळी राज यांची पत्नी, बहीण, सून, मुलगा अमित ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरेही होती. दर्शन घेऊन घरी परतत असताना अचानक त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला. इनोव्हा गाडीला हा अपघात झाल्याचे बोललं जातं आहे. या गाडीमध्ये शर्मिला ठाकरे आणि राज यांची बहीण होती.