अरबी समुद्रातील छत्रपतींच्या शिवस्मारकात १ हजार कोटींचा भ्रष्टाचार झालाय - नवाब मलिक

shiv smarak
Last Modified मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019 (10:47 IST)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील अश्वारूढ स्मारकात मुख्यमंत्र्यांच्या खात्याकडून एक हजार कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. याबाबत सीवीसीकडे तक्रार करणार असून त्यांनी दखल घेतली नाही तर कोर्टाकडे दाद मागणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत
देखील उपस्थित होते.

हा सर्व भ्रष्टाचार मुख्यमंत्री यांच्या आशिर्वादाने झाल्याचा आरोप करतानाच त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी पाऊले उचलण्यात येतील अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

मागच्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत सरकारने घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्याचा पार्ट - २ येतोय असं सांगितलं होते त्याची आज कागदपत्रे नवाब मलिक आणि काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केली.मागच्या आठवड्यात शिवस्मारकाबाबत भ्रष्टाचार उघड करतो असे सांगितल्यावरही मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तो मुद्दा घेतला नाही किंवा सरकारच्या माध्यमातून उत्तर दिलेले नाही. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यालाही उत्तर देत नाही. याउलट पवारसाहेब यांच्यावर ईडीचा गुन्हा दाखल केल्याचा विषय पुढे सोडला आणि शिवस्मारक घोटाळा बाजूला गेला, असेही नवाब मलिक म्हणाले.
हे घोटाळेबाज सरकार असून स्मारकातही घोटाळे करत आहेत. ३ हजार ८२६ कोटीचे टेंडर असताना लोयेस्ट टेंडर काढण्यात आले. ही किंमत २६९२ कोटी करण्यात आली. एल अॅ.ण्ड टी २५०० कोटीत कमी करतो असे सांगितले. ४२ टक्क्याने टेंडर भरतो असे दाखवायचे आणि १२०० कोटीने कमी करण्यात आले असे दाखवण्यात आले. हा पद्धशीर डिझाईन करुन भ्रष्टाचार केला आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

मुकुल रोहतगी यांची व व्ही. एन. खरे नामवंत वकील यांची कंपनी आहे. यांच्याकडून लॉ अॅण्ड ज्युडीसियलला बायपास करण्यात आले आहे. मग मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात लॉ अॅण्ड ज्युडीसियल कशासाठी ठेवले आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला. दोन लिगल ओपिनियनमध्ये शब्द ना शब्द एकच आहे. म्हणजे सुरुवातीपासून ठरवून एल अॅेण्ड टी ला टेंडर द्यायचे ठरले होते असा थेट आरोप नवाब मलिक यांनी यावेळी केला.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

पंतप्रधान मोदी सी विमानातून केवडिया येथून साबरमती ...

पंतप्रधान मोदी सी विमानातून केवडिया येथून साबरमती रिव्हरफ्रंटला पोहोचले, 30 मिनिटांत 200 किमी अंतर
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ ...

मुंबई बिघडविणार दिल्लीचे समीकरण?

मुंबई बिघडविणार दिल्लीचे समीकरण?
मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, ते दिल्ली ...

फुलराणी पारुपल्लीसोबत मालदीवमध्ये करीत आहे सुट्टी एन्जॉय

फुलराणी पारुपल्लीसोबत मालदीवमध्ये करीत आहे सुट्टी एन्जॉय
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व तिचा पती पारुपल्ली कश्यक सध्या मालदीवमध्ये ...

रिलायन्स इंडस्ट्रीजचे निकाल बाजारातील अपेक्षेपेक्षा चांगले

रिलायन्स इंडस्ट्रीजचे निकाल बाजारातील अपेक्षेपेक्षा चांगले
विश्लेषक आणि बाजारातील पंडितांच्या अंदाजानुसार रिलायन्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी आपल्या ...

येस बँकेच्या ताब्यात अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार

येस बँकेच्या ताब्यात अनिल अंबानी यांचे मुख्यालय जाणार
अनिल अंबानी यांच्या उद्योगसमूहाचे मुंबईतील मुख्यालय ‘रिलायन्स सेंटर’चा ताबा घेण्याची ...