संबंधित माहिती
- अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याच्या स्कूटरमधून सापडले 4 लाख रुपये, पोलीस हवालदाराने कुटुंबीयांना परत केले
- जन्मपत्रिकेतील अशुभ ग्रहांची महादशा आहे अपघाताचे मुख्य कारण
- आंध्र प्रदेशात रस्ते अपघातात सात ठार, 11 जखमी
- चारधाम यात्रेवर निघालेल्या गाडीचा भीषण अपघात,दोघे जागीच ठार
- लडाखच्या तुर्तुकमध्ये भीषण अपघातात भारतीय लष्कराचे 7 जवान शहीद
नाशिक-कळवण रस्त्यावर अपघात, ७ ठार, १६ गंभीर
नाशिक-कळवण रस्त्यावरील वणी जवळ मुळाणे बारी येथे भीषण अपघात झाला आहे. ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडण्यात आल्या होत्या. ट्रॅक्टरचालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने या दोन्ही ट्रॉली अचानक अल्टो कारवर उलटल्या. या भीषण अपघातात ७ जण जागीच ठार झाले असून १६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेले सर्व जण हे रस्त्याचे काम करणारे मजूर आहेत. हे सर्वजण जळगाव जिल्ह्यातील असल्याचे समजते. कारचालकांना ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होत असल्याचा अंदाज आल्याने कारमधील व्यक्तींनी कार सोडून पळ काढला. आणि क्षणार्धात दोन्ही ट्रॉली कारवर कोसळल्या. हा अपघात एवढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला असून ७ जण जागीच ठार झाले आहेत. तर, १६ जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. अपघातामुळे काही वेळ दुतर्फा वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस आणि अॅम्ब्युलन्सचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर जलदगतीने मदतकार्य सुरू करण्यात आले. जखमींना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.
