1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated: रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (19:48 IST)

वडोदराच्या केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट, 10 जण जखमी, बचावकार्य सुरू

गुजरातमधील वडोदरा येथे एका रासायनिक कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर तेथे भीषण आग लागली असून आतापर्यंत 10 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी हजर असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  
 
 दीपक नायट्रेट कंपनीत मोठा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून स्थानिक लोकांच्या  म्हणण्यानुसार दहा किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचा आवाज ऐकू आला. सध्या घटनास्थळी गोंधळाचे वातावरण असून लोक प्रचंड घाबरले आहेत.   अपघाताच्या जे व्हिडिओ समोर आले आहेत त्यात आकाशात धुराचे प्रचंड लोट दिसत आहेत. मध्येच आगीच्या ज्वाळाही दिसत आहेत.  
 
 याआधीही गुजरात आणि देशातील इतर भागात असे जोरदार स्फोट झाले आहेत. आगीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अलीकडेच दिल्लीतील मुंडका येथे  एका 4 मजली इमारतीत भीषण अपघात झाला होता. यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक बेपत्ता झाले. दिल्लीतील नरेला येथील एका चप्पल कारखान्याला भीषण  आग लागली होती. त्या घटनेत अग्निशमन दलाने वेळीच सर्वांची सुटका केली.