शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (16:04 IST)

मुलीला शाळेत सोडायला जात असताना अपघात, बाप-लेकीचा जागीच मृत्यू

लातूर- मुलीला शाळेत घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद शिक्षकाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील शिक्षक आणि त्यांच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सकाळी लातूर शहरालगतच्या म्हाडा कॉलनी समोरील रस्त्यावर घडली आहे. 
 
दत्तात्रय पांचाळ (38) आणि मुलगी प्रतीक्षा पांचाळ (13) अशी मृतांची नावे आहेत. दत्तात्रय पांचाळ हे मुळचे लातूर तालुक्यातील भुसणी येथे वास्तव्यास होते. मुलगी प्रतीक्षा ही लातूरातील ज्ञानेश्वर इंग्लिश स्तूलमध्ये इयत्ता 8 वीच्या वर्गात शिकत होती. वडील मुलीला  दररोज लातूर येथे शाळेत सोडून पानचिंचोली येथे जात होते. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी मुलीला घेऊन ते लातूरला येत असताना म्हाडा कॉलनी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेच ही दुर्घटना घडली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 
 
दत्तात्रय पांचाळ पानचिंचोली येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक होते. मात्र मुलगी प्रतीक्षा ही लातूरातील शाळेत असल्याने ते रोज अगोदर मुलीला शाळेत सोडायला जात असे. परंतु सोमवारी सकाळी झालेल्या या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला आहे.