मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 31 जानेवारी 2022 (15:10 IST)

पेटवून घेतलेल्या महिलेची दुसऱ्या मजल्यावरुन उडी

The burnt woman jumped from the second floorपेटवून घेतलेल्या महिलेची दुसऱ्या मजल्यावरुन उडी Marathi Regional News
महिलेने स्वतःला पेटवून घेत घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली आहे. पुजा मनोहर चुग (वय ३३ रा. तारकपूर अहमदनगर) असे जखमी महिलेचे नाव आहे. अहमदनगर शहरातील तारकपूर भागात सोमवारी सकाळी ही घटना घडली.
 
जखमी महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुजा चुग यांनी कोणत्या कारणातून पेटवून घेतले याची माहिती समोर आली नसून पोलीस तपास करत आहेत.
 
पुजा आज सकाळी घरातील दुसऱ्या मजल्यावर असताना त्यांनी पेटवून घेतले. काही कळायच्या आत ही महिला ओरडत आपल्या घरावरील दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून उडी मारली. हे चित्र अनेक नागरिकांनी पाहिले. दुसऱ्या मजल्यावरुन पडल्यामुळे पुजा यांच्या डोक्याला मार लागला आहे. त्यांच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.