सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2022 (10:53 IST)

2 साईभक्तांचा अपघाती मृत्यू

accident
शुक्रवारी पाच तरुण मित्र सायकलवरून शिर्डीस जात असताना पाथरे शिवारात पाठीमागून येणार्‍या महिंद्रा कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला.  हे पाची सिन्नर शहरातील लोंढे गल्लीतील असून तीन सायकलस्वार किरकोळ जखमी झाल्याची दुर्दैवी घटना  घडली.
 
आदित्य महेंद्र मिठे (24) व कृष्णा संतोष गोळेसर (17) अशी मृत तरुणांची नावे आहेत. पाचही सायकलस्वार रस्त्याच्या डाव्या बाजूने एका मागे एक असे चालत असताना ईशान्येश्वर मंदिराकडे जाणार्‍या कमानीसमोर मुंबई-विरारहून शिर्डीकडे जाणार्‍या महिंद्रा एक्सयुव्ही कारने मागील दोन सायकलस्वरांना जोरदार धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, शिकत असलेल्या महिला चालकाकडून हा अपघात झाला असावा असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. दरम्यान, अपघातावेळी धडकेचा आवाज ऐकून रस्त्यालगत वास्तव्यास असलेल्या तरुणांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन या युवकांनी पांगरी येथील रुग्णवाहिकेला पाचारण केले. 
Edited by : Smita Joshi