गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2022
  3. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक 2022
Written By
Last Modified: शनिवार, 5 नोव्हेंबर 2022 (13:56 IST)

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचं निधन, दोनच दिवसांपूर्वी मतदान केलं होतं

देशातील पहिले मतदार श्याम सरन नेगी यांचं आज पहाटे 2 वाजता निधन झाले. या जगाचा निरोप घेण्यापूर्वीच त्यांनी मतदान करून आपली शेवटची इच्छा पूर्ण केली. आता या जगाचा निरोप घ्यावा लागणार याची जाणीव त्यांना झाली असताना त्यांनी 2 नोव्हेंबरला घरबसल्या मतदान करणार असल्याची मागणी प्रशासनाकडे केली होती.
 
मिळालेल्या माहितीनुसार प्रशासनाने त्यांना तुम्ही मतदान कुठून करणार असे विचारले असता त्यांनी सांगितले की दरवेळेप्रमाणे मी याही वेळी कल्पा प्राथमिक शाळेच्या मतदान केंद्रावरून मतदान करणार आहे. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी घरुनच मतदान केले. शेवटच्या वेळी या विधानसभेत मतदान करून त्यांनी संपूर्ण देशाला आणि किन्नौरच्या मतदारांना संदेश दिला आहे.
 
नेगी यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या घरी लोकांची गर्दी होऊ लागली. नेगी यांच्या मागे तीन मुले आणि पाच मुली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी त्यांच्या नातवाशी फोनवर बोलून त्यांचे सांत्वन केल्याची माहिती मिळाली.
 
1917 मध्ये जन्मलेल्या नेगी यांनी 1951 पासून आतापर्यंत 16 वेळा लोकसभा निवडणुकीत मतदान केले आहे. 2014 पासून ते हिमाचलचे निवडणूक आयकॉन देखील आहेत. नेगी यांनी 1951 पासून प्रत्येक निवडणुकीत मतदान केले आहे. पहिल्या मतदाराने प्रथमच घराच्या अंगणात बांधलेल्या पोस्टल बूथमधील पाकिटात मतपेटीत टाकले होते. नेगी हे केवळ हिमाचलचेच नव्हे तर देशाचे आयकॉन राहिले. वयाच्या 106 वर्षांनंतरही त्यांची मतदानाची तळमळ लोकशाहीच्या बळकटीकरणात प्रत्येक मताचे महत्त्व असल्याचा पुरावा आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले की, “स्वतंत्र भारताचे पहिले मतदार आणि किन्नौरचे श्याम सरन नेगी जी यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. आपले कर्तव्य बजावत असताना त्यांनी 2 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी 34व्यांदा मतदान केले, ही आठवण सदैव भावूक राहील.  ॐ शांति! ईश्वर त्यांच्या पुण्यवान आत्म्यास त्यांच्या चरणी चिरशांती देवो आणि शोकाकुल परिवारास बळ देवो.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आपल्या सुंदरनगर सभेत नेगींना श्रद्धांजली अर्पित केली.

Edited by: Rupali Barve