सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 8 जून 2024 (09:56 IST)

शिवसेना नेते महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला अटक

mahesh Gaikwad
शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी दीपकला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दीपक ने मद्यधुंद अवस्थेत फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी दिली. 
महेश गायकवाड यांच्यावर गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात अंदाधुंद गोळीबार केला. 

महेश गायकवाड यांना फेसबुकने धमकी देत दीपक याने लिहिले होते आमदार गणपत यांनी चार गोळ्या झाडल्या मी तुझ्यावर आठ गोळ्या झाडेन अशी धमकी देण्यात आली असून महेश यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी दिपकला अटक केली असून दीपक ने महेश गायकवाड यांना ओळखत नाही किंवा कोणताही वाद नसल्याची कबुली दिली.

तसेच मद्यधुंद अवस्थेत त्याने धमकी दिल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याला अटक करून महेश गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षा दिली आहे. 

पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दीपकच्या कृत्यामागे आणखी काही कारण आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेने सोशल मीडियावरही बरीच चर्चा रंगली आहे,  
 
Edited by - Priya Dixit