1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2024 (21:44 IST)

शिवसेना प्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी

mahesh Gaikwad
facebook
शिवसेना प्रमुख महेश गायकवाड यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी त्यांना सोशल मीडिया अकाऊंटवरून दीपक कदम नावाच्या व्यक्तीने दिली असून महेश गायकवाड यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 
 
जमिनीच्या वादावरून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहे. आता पुन्हा महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून या धमकी मुळे खळबळ उडाली आहे. 
 
सोशल मीडियाच्या माध्यमाने धमकी देण्यात आली असून गणपत गायकवाड यांनी 4 गोळ्या झाडल्या मी 8 गोळ्या झाडीन.असं म्हटलं आहे. या प्रकरणात धमकी देणाऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दीपक कदम वर गुन्हा दाखल केला आहे. कदम याने धमकी का दिली? हा व्यक्ती कोण आहे याचा तपास पोलीस करत आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit