1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 12 फेब्रुवारी 2024 (09:50 IST)

गणपत गायकवाड यांचा ड्रायव्हर रणजीत यादवला अटक

ganpat gaikwad  shot mahesh gaikwad
भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने गायकवाड यांचा खासगी चालक रणजीत यादव याला शनिवारी अटक केली आहे. रविवारी उल्हासनगर कोर्टात रणजीत याला हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ फेब्रुवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी गायकवाड यांचा निकटवर्ती विकी गणात्रा याला पोलिसांनी अटक केली आहे.
 
जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यातच ही गोळीबाराची घटना घडली शुक्रवारी रात्री आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड यांच्यासह ६ जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड, संदीप सरवणकर, हर्षल केणे तसेच विकी गणात्रा याला अटक केली आहे. गायकवाड यांचा मुलगा वैभव याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल असून वैभव व नागेश बडेकर याचा पोलीस शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी विकी याने ठाणे गुन्हे शाखेकडे आत्मसमर्पण केले होते.

Edited by -Ratnadeep Ranshoor