1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2024 (17:30 IST)

जेवणासाठी पैसे मागितल्यावर हॉटेल मालकावर चाकूने हल्ला, आरोपींना अटक

हॉटेल मालकाने जेवण्याचे बिल मागितल्यावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याण येथे  कोळसेवाडी पोलीस ठाण्यांतर्गत एका ढाब्यावर घडली आहे. या हल्ल्यात हॉटेल मालक जखमी झाला असून त्याचे एक बोट देखील कापले गेले आहे. पोलिसांनी आरोपीना अटक करून न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने त्यांची कोठडीत रवानगी केली आहे. 
 
सदर घटना 3 जून रोजी कोळसेवाडी पोलीस ठाण्यातर्गत एका ढाब्याची आहे. रात्री 12 :30 च्या सुमारास हॉटेलचे मालक हॉटेलला बंद करून दोन दुचाकीवर चार जण जेवायला आले पण हॉटेल बंद करत असल्यामुळे त्यांनी जेवण पॅक करून घेतले आणि पैसे न देता तिथून जायला निघाले. या वर हॉटेलच्या मालकाने त्यांच्याकडून जेवण्याच्या बिलाचे पैसे मागितले या वर एकाने त्यांना धमकावले आणि म्हटले  मी या ठिकाणचा भाऊ आहे,  तू मला ओळखत नाही. यावरून त्यांच्यात वाद झाला.

वाद होत असताना मालकाचा लहान भाऊ गणेश तिथे आला आणि त्याने प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावर चौघांपैकी एकाने चाकूने गणेशच्या मानेवर चाकूने हल्ला केला त्याने हाताने चाकू रोखल्यावर त्यांच्या मानेला किरकोळ दुखापत झाली पण हाताला गंभीर दुखापत झाली.या हल्ल्यात त्यांचे एक बोट कापले गेले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
हॉटेल मालकाने पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी, आणि एक चाकू जप्त केला असून त्यांना न्यायालयात हजर केले असून न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे. 

Edited by - Priya Dixit