मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (21:49 IST)

जबाबदारीने वागा, जबाबदारीने काम करा मुख्यमंत्र्यांनी दिला अब्दुल सत्तार यांना कानमंत्र

abdul sattar
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची कानउघाडणी केली आहे.  माध्यमांसमोर बोलताना जबाबदारीने बोला, असं शिंदेंनी सत्तारांना सांगितलंय. जबाबदारीने वागा, जबाबदारीने काम करा, असा कानमंत्र शिंदेंनी अब्दुल सत्तारांना दिलाय. तसेच यापुढे वादग्रस्त वक्तव्य नकोत, असा सज्जड दमही मुख्यमंत्र्यांनी अब्दुल सत्तारांना दिला आहे.
 
अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना शिवराळ भाषा वापरली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. 
 
सत्तारांच्या विधानाची राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली होती. या प्रकरणावर रान पेटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सत्तारांची कानउघाडणी केली. तसेच सत्तारांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलं तर त्यांचं मंत्रिपद धोक्यात येईल, असा इशारा त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना माध्यमांशी संवाद साधू नये. तसेच या प्रकरणी कुठेही भाष्य करु नये, अशी सूचना देखील दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

Edited by-Ratnadeep Ranshoor