मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified गुरूवार, 13 मे 2021 (11:46 IST)

रम्मी जुगार खेळणाऱ्या 15 जणांवर कारवाई; 11 लाख 76 हजारांचा मुद्देमाल जप्त

सामाजिक सुरक्षा विभागाने खेड तालुक्यातील मोई येथे सुरू असलेल्या एका रम्मी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यात 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून 11 लाख 76 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 
 
मसूद मकबल शेख (वय 50, रा. मोरे पाटील चौक, कुदळवाडी, चिखली) आणि अन्य 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील मोई येथे एका शेतामध्ये बांधलेल्या खोलीच्या समोरील मोकळ्या जागेत काहीजण जुगार खेळत आहेत, अशी माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
 
या कारवाईमध्ये 78 हजार 630 रुपये रोख रक्कम, एक लाख 52 हजार 500 रुपये किमतीचे मोबाईल फोन, नऊ लाख 45 हजारांच्या नऊ दुचाकी, एक चारचाकी वाहन आणि 320 रुपयांचे रम्मी जुगाराचे पत्ते, असा एकूण 11 लाख 76 हजार 450 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.