बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 27 जुलै 2022 (22:14 IST)

उघड्यावर कचरा टाकल्यास होणार कारवाई; हॉटेल्स, चायनिज गाडे मालकांना नोटीसा

सातारा शहरात कचऱ्याची समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी कठोर भूमिका घेतली आहे. शहरात उघड्यावर कचरा टाकणे बंद करण्यासाठी शहरातील हॉटेल्स, चायनिज गाडे, हातगाडे, फळगाडे, भाजीपाल्याचे गाडे अशा सर्वांना नोटीस बजावल्या आहेत. उघडय़ावर कचरा टाकताना कोणी आढळून आल्यास संबंधितांवर घनकचरा अधिनियम 2016 व महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नागरि अधिनियम 1965 नुसार कायेदशीर कारवाई करण्यात येणार आहे.
 
शहरात टाकण्यात येणारा कचरा पालिकेच्यावतीने उचलला जातो. काही लोक जाणीवपूर्वक उघड्यावर कचरा टाकतात. असा कचरा टाकणे बंद करण्याच्या अनुषंगाने पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी बुधवारी हॉटेल्स व्यवसायिक, चायनीज गाडे, हातगाडे, फळगाडे, भाजी गाडे यांना नोटीसा बजावली आहे.