शिवसेनेच्या दोन्ही गटातले नेते शिंदे आणि ठाकरेंना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहे
राज्यात काही दिवसांपासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी झाल्यावर विराम लागेल अशी शक्यता होती. मात्र आता पुन्हा एकदा एका नव्या 'शक्यते'नं नव्या विषयाला तोंड फोडलं आहे. महाविकास आघाडीचं गणित न पटल्याचं सांगत शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाहेर पडले. यामुळे फक्त शिवसेनेची सत्ताच गेली नाही, तर शिवसेना पक्षाचे दोन गट झाले. उद्धव ठाकरेंचं भवितव्य, पक्षाचं, संघटनेचं अस्तित्व सुद्धा अत्यंत धोक्यात आलेलं असतानाच आता एक नवी बातमी समोर आली आहे. यावरुन येणाऱ्या काळात सेना-भाजव एकत्र येऊ शकतात. अर्थात शिंदे आणि ठाकरे एकत्र येऊन भाजपसोबत जातील आणि अशी शक्यता निर्माण झाली आहे.
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यापासून आतापर्यंत अनेकदा आपल्या मनातली खदखद व्यक्त केली. मात्र त्यांना आमची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय. तर दुसरीकडे शिंदे गटातील नेत्यांकडून उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या भाजपनेत्यांना सज्जड दम दिल्याचं पाहायला मिळतं. तर दुसरीकडे भाजपचे सोमय्या, राणे सुद्धा सेना नेत्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे भाजप आणि सेनेतला संघर्ष संपता संपेना झालाय. ही सर्व गणितं जरी गुंतगुंतीची असली तरी येणाऱ्या काळात शिंदे गट, ठाकरे गट एकत्र येतील अन् पुन्हा शिवसेना भाजपसोबत जाईल अशी शक्यता जास्त आहे.