गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (08:03 IST)

आमचं खरंतर दोघांची मन जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो राज ठाकरे

raj thackeray
राज ठाकरे हे सध्या पाच दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते अनेक गाठीभेटी घेणार असून, उद्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन चर्चा करणा आहेत. आज राज ठाकरे यांनी नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी फुटाळा तलावाची आणि संगीत कारंजांचा ‘लेझर शो’ची पाहणी केल्यानंतर नितीन गडकरींची स्तुती देखील केली आहे.
 
याप्रसंगी राज ठाकरे म्हणाले “ माझे मित्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नागपुरमधील माझ्या सर्व बंधु-भगिनींनो.. मी असं काही आजपर्यंत भारतात पाहिलेलं नाही. जे काही पाहीलं आहे ते भारताच्या बाहेरच पाहिलेलं आहे. नितीन गडकरी जे काही करतात ते भव्य दिव्यंच असतं. काही खाली करतच नाहीत, ते सगळं वरूनच असतं. कारंजाही वर जातो उड्डाणपूल देखील वर जातो. सगळं वरूनच करतात. पण ते जे विचार करतात. आमचं खरंतर दोघांची मन जुळण्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो. नितीन गडकरी जेव्हा एखादी गोष्ट बोलतात, तेव्हा ते बोलत असताना असं वाटतं की हे सगळं कसं होणार. पण ते झाल्यावर कळतं की हे होऊ शकतं.”