सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 सप्टेंबर 2022 (17:49 IST)

वेदांता प्रकल्पावरून नाना पाटोळेंचा फडणवीसवर हल्लाबोल

nana patole
वेदांतासारखे उद्योग ईडी सरकारने हे गुजरातला पाठवले, महाराष्ट्राची फसवणूक  करून गुजरातला पाठवले जात आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे  पाणी गुजरातला पळवले आणि आता वेदांता देखील महाराष्ट्राच्या हातातून निसटून गुजरातला पाठवला गेला असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पत्रकार परिषदेत  बोलताना केली.
 
पटोले म्हणाले, महाराष्ट्रात ईडीचे सरकार आल्यापासून ओबीसी मुलांची स्कॉलरशिप थांबवली, राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे नुकसान झालं. मात्र,शेतकऱ्यांना मदत करण्याची घोषणा अनंत चतुर्दशीला केल्यापासून आता पर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही उपमुख्यमंत्र्याना आम्ही आणि जनतेनं किती सिरीयस घ्यायचं . हे ईडी सरकार लोकशाही विरोधी असल्याचे ते म्हणाले.