शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 सप्टेंबर 2022 (13:04 IST)

स्पर्धेदरम्यान कोल्हापुरातील राष्ट्रीय खेळाडूचा दुर्देवी मृत्यू

death
सातारा रनर्स फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या सातारा हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धेत एका स्पर्धकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. राज पटेल असे या स्पर्धकाचं नाव असून तो कोल्हापुरातील राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू होता. 

दरवर्षी सातारा रनर्स फोंडेशन आयोजित केली जाणारी सातारा हिल हाफ स्पर्धा सकाळी 6:30 वाजता सुरु झाली. त्यात या खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्देवी मृत्यू झाला आहे. स्पर्धेदरम्यान हा जमिनीवर कोसळला त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.