मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified रविवार, 18 सप्टेंबर 2022 (12:36 IST)

राज ठाकरे यांचा आजपासून विदर्भ दौरा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 18 सप्टेंबर विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 8.30 वाजता विदर्भ एक्सप्रेसने नागपूरला पोहोचणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी सांगितले. त्यानंतर रविभवन येथे शहर व जिल्ह्यातील अधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे. 
 
19 सप्टेंबर रोजी ते रविभवनातच गोंदिया, भंडारा आणि वर्धा हिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असून, त्यामध्ये ते पक्ष संघटना मजबूत करून आगामी निवडणुकी बाबत मार्गदर्शन करणार आहेत. 
 
20 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे  प्रदेश सरचिटणीस यांनी सांगितले. त्यांच्या स्वागतासाठी सर्व अधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रेल्वे स्थानकावर पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.