मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 सप्टेंबर 2022 (10:50 IST)

आंतरधर्मीय विवाहाबाबत खासगी विधेयक मांडणार - खासदार अनिल बोंडे

anil bonde
आंतरधर्मीय विवाहाबाबत खासगी विधेयक मांडणार असल्याची माहिती भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. आंतरधर्मीय विवाह कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याचेही खासदार बोंडे म्हणाले.
 
खासदार अनिल बोंडे म्हणाले, "अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांडमधील आरोपी देखील लव्ह जिहादला प्रोत्साहित करायचा. त्याने इंदोरमधील मुलगी पळून आणली होती. शिवाय मेळघाट मधील मुलींना प्रलोभनं देऊन किंवा धमक्या देऊन पळवून घेऊन जातात. यावर मी एक बिल आणणार आहे."
 
बोंडे पुढे म्हणाले, "बोगस संस्था हे विवाह लावून देतात, यात खोटा मौलवी उभा केला जातो. अमरावतीची जी मुलगी पळून गेली होती त्या मुलीच्या आई-वडिलांनी रडत-रडत मला फोन केला होता. आमच्या मुलीला शोधा अशा विनवण्या त्यांच्याकडून करण्यात येत होत्या. त्यानंतर ते खासदार नवनीत राणा यांच्याकडे गेले. त्यानंतर नवनीत राणा या पोलीस ठाण्यात गेल्या. त्यांनी जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत पोलिसांना जाब विचारला असेल तर त्यात वावगं काय?" दरम्यान, यापूर्वीही अनिल बोंडेंनी लव्ह जिहादबाबत अधिवेशनात विधेयक आणणार असल्याचे म्हटले होते.