रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (21:36 IST)

मोदी हे ओबीसी नाहीत : नाना पटोले

Nana Patole
राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाने आडनावावरुन माहिती संग्रहित केली होती. परंतु, आडनावावरुन जात समजत नाही. एकाच आडनावाचे लोक अनेक जातींमध्ये असू शकतात. त्यामुळे मोदी हे ओबीसी नाहीत”, असेही नाना पटोले यांनी म्हटले. पुण्यातील पत्रकार परिषदेत नाना पटोले बोलत होते.
 
मोदींवर टीका करत “मोदी ओबीसी नाहीत, हे आम्ही देशासमोर आणू. आपला देश, देशाच संविधान धोक्यात आलं आहे”, असे म्हटले. तसेच, ‘भाजप त्यांना ओबीसी म्हणून प्रोजेक्ट करत आहे’ असा आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधील श्रीमंत जातींपैकी आहेत, आम्ही ते उघड करणार आहोत, असे मोठं वक्तव्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
 
दरम्यान, “फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला नेणारे सगळे मोदी आणि शाहांचे हस्तक आहेत. त्यांना महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्रातील तरुण जनतेचे काहीही देणेघेणे नाही. मुख्यमंत्र्यांबाबत काही न बोललेलेच बरे. सध्याचे मुख्यमंत्री नाचगाण्यात व्यस्त आहे”, असे नाना पटोले यांनी म्हटले.