गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (20:58 IST)

त्र्यंबकेश्वर मंदिरातील ऐतिहासिक शिवलिंगाची झीज, वज्रलेप करण्याबाबत विचार सुरू

Trimbakeshwar Mandir
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील ऐतिहासिक शिवलिंगाची झीज झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याची गंभीर दखल घेत पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिवलिंगाची पाहणी केली आहे. दररोज होणाऱ्या अभिषेकामुळे ही झीज झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवलिंगाला पुन्हा वज्रलेप करण्याबाबत विचार केला जात आहे.
 
गेल्या ८ वर्षांपूर्वी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला वज्रलेप करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुन्हा या शिवलिंगाची झीड होत असल्याचे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. शिवलिंगाची झीज होत असल्याने देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांसह भक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. येत्या सोमवारी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक त्र्यंबकला दाखल होण्याची चिन्हे आहेत.