1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Dussehra gathering will be held at Shivtirtha itself, Uddhav Thackeray decided

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार,उद्धव ठाकरे यांचा निर्धार

शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्या संदर्भात महत्त्वाचं भाष्य केलं आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी तातडीने कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी विभाग प्रमुखांना बैठकीत दिल्या आहेत.
 
शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार आहे. यामुळे मनात कोणताही संभ्रम ठेवू नका. महिला आघाडी, युवा सेना आणि शिवसैनिकांनासोबत घ्या. मुंबई महापालिकेमध्ये रिमाइंडर अर्जही देण्यात आला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
 
गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. त्यांच्याकडे प्रकल्प गेला, पण राज्य सरकार त्यावेळी काय करत होतं? दोन महिन्यात फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? यांसारख्या कंपन्या राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी याचं आत्मपरीक्षण करावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढील लेख
BCCI New Rule: फुटबॉलप्रमाणेच क्रिकेटमध्येही सामन्यादरम्यान बदलणार खेळाडू,बीसीसीआयचा नवा नियम जाणून घ्या