सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 18 सप्टेंबर 2022 (16:44 IST)

यवतमाळ येथे मोबाईल टॉवरवर रंगली तरुणाची झिंगाट पार्टी

daru party
सध्या काहीसे हटके करण्याचे तरुणांना फेड आहे. यवतमाळच्या भोसा येथे दोन तरुणांनी चक्क मोबाईलच्या टॉवरवर बसून दारू पार्टी केली.अनिकेत गाढवे आणि राकेश चव्हाण अशी या तरुणांची नावे आहेत. दारूची नशा त्यांना एवढी चढली की त्यांना कुठे आहोत, काय करत आहोत ह्याची शुद्ध नव्हती. त्यांनी टॉवरवर चढून आरडाओरड करायला सुरु केले असता सर्व गावातील लोक जमा झाले.

ते दोघे दारूच्या नशेत एवढे तल्लीन झाले की त्यांना खाली कसे उतरायचे ते जमेच ना. त्यांची अशी अवस्था पाहून कुटुंबीयांनी रडारड करायला सुरु केले. त्यांना खाली काढण्यासाठी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला तातडीनं बोलाविले. त्यांच्या जीवाला धोका आहे बघितल्यावर अग्निशमन दलाचे  जवान टॉवरवर चढले आणि त्यांना सुखरूप खाली उतरवले. या परिसरात अनेक अवैध दारूचे अड्डे आहेत. त्यांना बंद करण्याची मागणी इथलं नागरिक करत असताना ही अद्याप कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले.