शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (14:57 IST)

आदित्य ठाकरेंचं मंत्री गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर

Aditya Thackeray
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज गणपती दर्शनासाठी नवीमुंबई ,पनवेलमध्ये भेट दिली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना गुलाबराव पाटलांवर टीका केली. दरम्यान, आदित्य ठाकरे गोधडीत नव्हते तेव्हा मी शिवसेनेत होतो, असा हल्लाबोल शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केला होता. यालाच शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात गोधडी शब्दाचा वापर केला होता. तेच हे कॉपी करत आहे. एकच प्रश्न आहे, ३२ वर्षांच्या तरुणाने प्रश्न विचारायचे नाही का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
 
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे आता बोलण्यासारखं काही राहिलं नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या भाषणात गोधडी शब्दाचा वापर केला होता. तेच हे कॉपी करत आहेत. एकच प्रश्न आहे, ३२ वर्षांच्या तरुणाने प्रश्न विचारायचे नाही का, माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर का खुपसला, शिवसेना का फोडली हे विचारायचं नाही का, असं आदित्य ठाकरे म्हणाले.