मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (15:47 IST)

शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमानुसार जे योग्य असेल, ते केलं जाईल, अशी सूचक प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यावरून शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
 
यासंदर्भात नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर आगपाखड केली आहे. दसरा मेळावा शिवसेनेचाच असतो आणि शिवसेनेचाच राहणार, असं ठामपणे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. “आम्ही परवानगीसाठी सतत प्रयत्न करत आहोत. पण गद्दार सरकार दडपशाहीचं धोरण अवलंबत आहे. या सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही. पण शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होतो ही प्रथा आहे. जनता देखील बघत आहे. अनेक वर्ष महाराष्ट्राची राजकीय परंपरा मोडून ही गद्दारी झाली आहे. हीच गद्दारीची प्रथा हे गद्दार खोके सरकार पुढे नेत आहे”, असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
 
हा शिवसेनेचा विषय आहे. शिवसेना शिवतीर्थावर नेहमीच दसरा मेळावा करत आली आहे. खोके सरकार किती दिवस टिकेल, हे काही दिवसांतच आपल्याला कळेल. आम्ही परवानगीसाठीचा अर्ज द्यायला जात आहोत. पण तिथे कुणी त्याचा स्वीकार करत नाहीये. हे सरकार दडपशाहीचं सरकार बनू लागलंय”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.