Festival Posters
✕

Disha Salian Death Case सतीश सालियन यांच्या नोटीसला आदित्य ठाकरे यांचे उत्तर, २६ पानांत आपली भूमिका मांडली

Updated: गुरूवार, 24 सप्टेंबर 2026 (11:01 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार आदित्य ठाकरे यांनी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी सतीश सालियन यांनी पाठवलेल्या मानहानीच्या नोटीसला उत्तर दिले आहे. वृत्तानुसार, त्यांचे वकील अंशुमन सिन्हा यांनी आदित्य ठाकरे यांच्या वतीने २६ पानी उत्तर सादर केले आहे. सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे यांना ५०० कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली होती.
 
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आपल्यावर झालेल्या आरोपांनंतर आदित्य ठाकरे यांनी १६ सप्टेंबर रोजी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी हे आरोप आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते आणि दिशा सालियनशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर, दिशाचे वडील सतीश सालियन यांनी त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली.
ALSO READ: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अमित ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या बचावासाठी पुढे आले, भाजपचा हल्लाबोल
सतीश सालियन यांनी १७ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये आदित्य ठाकरे यांच्या सोशल मीडिया पोस्टवर आक्षेप घेण्यात आला होता. या नोटीसमध्ये कथित आक्षेपार्ह आणि बदनामीकारक विधानांबद्दल माफी मागण्याची आणि ₹५०० कोटींची नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही नोटीस पाठवण्यात आल्याचे वृत्त आहे. सतीश सालियन यांनी आपल्या वकिलांसह वांद्रे येथील आदित्य ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी भेट दिली, जिथे त्यांना ही नोटीस सुपूर्द करण्यात आली. या घडामोडीनंतर, आदित्य ठाकरे यांनी आता नोटीसला लेखी उत्तर सादर केले आहे.
 
आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी काय म्हटले?
आदित्य ठाकरे यांचे वकील अंशुमन सिन्हा यांनी सादर केलेल्या उत्तरात, सतीश सालियन यांच्या नोटीसमधील आरोप आणि दावे फेटाळण्यात आले आहे. उत्तरात म्हटले आहे की, नोटीसमधील आरोप निराधार, खोटे आणि कायदेशीरदृष्ट्या टिकू न शकणारे आहे. उत्तरात हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, नोटीसमध्ये ज्या गोष्टी स्पष्टपणे मान्य केलेल्या नाहीत, त्या मान्य केल्याचे मानले जाऊ नये. आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, या आपल्या मागणीचा पुनरुच्चारही केला.
ALSO READ: "चारित्र्यहनन थांबवा," दिशा सालियन या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही; उद्धव ठाकरे संतापले
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments