रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 25 ऑगस्ट 2018 (09:15 IST)

आता खड्डे बुजणार का? ठाकरेंच्या गाडीचे टायर फुटले

रस्त्यांवर असणाऱ्या खड्ड्यांचा त्रास सर्वसामान्यांना रोजच होतो. मात्र आता  युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनाही  खड्ड्यांचा फटका बसला आहे. मुंबई – नाशिक रस्त्यावरील घोटीजवळ पाडळी गावात रस्त्यांवर खूप मोठे खड्डे आहेत. वारंवार तक्रार करुनही प्रशासन याकडे लक्ष देत नाही. नाशिक दौऱ्या दरम्यान येथूनच जात असताना आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचे टायर फुटले. मध्यरात्री टायर फुटल्याने त्यांच्या सोबत असणाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली. अखेर आदित्य ठाकरे दुसऱ्या कारने हॉटेलवर पोहोचले.