बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: कोडागू , शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018 (12:45 IST)

भिकार्‍यांची केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदत

केरळमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीतून तिथल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी समाजातील प्रत्येक वर्गाकडून आर्थिक रसद पुरवली जात आहे. अहमदनगरधील देहविक्रय करणार्‍या महिलांपाठोपाठ आता कर्नाटकच्या धारवाडमधील भिकार्‍यांनीही केरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे करत त्यांच्या पुंजीतील रक्कम कोडागू आपत्ती मदत निधीत जमा केली आहे.
 
धारवाड येथील भिकार्‍यांना बकरी ईदनिमित्त मुस्लीम बांधवांकडून जकातच्या माध्यमातून घसघशीत रक्कम मिळाली. या भिकार्‍यांनी ही रक्कम घरात खर्च करण्याऐवजी पूरग्रस्तांसाठी दिली आहे. त्यांनी 500 ते 1000 रुपये पूरग्रस्तांसाठीच्या मदतनिधीत जमा केले आहेत. एसयूसीआय (कम्युनिस्ट) यांच्याकडे ही रक्कम जमा करण्यात आली आहे.
 
कर्नाटकमध्येही पूरामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.