बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 15 जून 2019 (16:58 IST)

आदित्य ठाकरे हे राज्याचे नेतृत्व करतील

उद्धव ठाकरे 16 जून रोजी प्रभू श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येला भेट देणार असून, त्यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबद्दल पत्रकार परिषद घेतली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जोर लावून काम करत आहेत. शिवसेनेचे एक नेते असल्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी आपली कामं सुरू केली असून, आदित्य ठाकरे यांच्याकडे राज्याचं नेतृत्व करण्याची पूर्ण क्षमता आहे असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिली त्यांनी असं म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरेंबरोबर शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदारही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे हे उपमुख्यमंत्री नाहीतर मुख्यमंत्री होण्याच्या तयारीत आहेत असे राऊत यांना सुचवायचे आहे. विधानसभा निवडणूक जवळ आली असून त्यामुळे शिवसेनेने आता मोर्चेबांधणी सुरु केली आहे.