1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Administration announces paid holiday for voting in Baramati Assembly constituency by-election

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासना कडून सवेतन सुट्टी जाहीर

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क सर्वांना बजावता यावा या साठी  प्रशासनाने सर्व कामगारांची आणि कर्मचाऱ्यांसाठी सवेतन सुट्टी जाहीर केली आहे.
निवडणूक  आयोगांच्या निर्देशानुसार, मतदानाच्या दिवशी मतदारसंघातील सर्व व्यापारी संस्था, औद्योगिक उपक्रम, खासगी कंपन्या, आयटी पार्क, मॉल आणि दुकाने यांमधील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे अनिवार्य आहे. केवळ पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास, अपवादात्मक परिस्थितीत कर्मचाऱ्यांना मतदानासाठी किमान २ ते ३ तासांची सवलत देणे बंधनकारक आहे. 
या आदेशानुसार, बारामती विधानसभा मतदारसंघाचे मतदार असलेले कर्मचारी, मतदारसंघाबाहेर कामानिमित्त बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना लागू असेल.  
जर कोणत्याही आस्थापनेने कर्मचाऱ्याला मतदानासाठी सुट्टी नाकारली किंवा वेतनात कपात केली, तर त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायदा आणि कामगार कायद्यानुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सर्वाना नियमाचे पालन करणे अनिवार्य आहे. असे आवाहन करण्यात आले आहे. 
Edited By - Priya Dixit
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा
पुढील लेख
LIVE: खासदार शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल