1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 31 जुलै 2019 (09:50 IST)

खडकवासला धरण ओवर फ्लो नागरिकांना प्रशासनाच्या सूचना

Administration instructions to the Khadakwas Dam over flow citizens
पुणे येथील खडकवासला धरणातून १३९८१ कयूसेक पाण्याचा विसर्ग पाण्याचा विसर्ग सुरू असुन नदीपात्रातील दोन्ही किनारच्या भागातील काही रस्ते पोलिस वाहतूक शाखेच्या वतीने सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहेत. लगतच्या नागरिकांनी व नियमित रस्ता वापर करणा-या नागरिकांनी कृपया अन्य पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन केले आहे.
 
नदीपात्रातील भागातून जाण्याचा प्रयत्न करू नये, नदीपात्र किनारी भागात मनपाचे वतीने सुचना फलक लावलेले असून, सदर भागात मनपा कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. कर्माचारी यांचे वतीने नागरिकांना महत्वाच्या सूचना देण्यात येत आहेत.
 
तर कृपया नागरिकांनी नदीपात्रातील रस्त्याचा वाहतूकीस वापर करू नये. त्यात वाहने उभी करू नयेत, उभी केलेली वाहने सुरक्षित जागी लावावीत, मनपाचे संबंधित क्षेत्रिय आयुक्त, क्षेत्रिय अधिकारी, अन्य अधिकारी, कर्मचाती यांना सतर्कतेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत, तरी कृपया नागरिकांनी नोंद घेवून सहकार्य करण्याचे पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या  वतीने आवाहन करण्यात आले आहे.