रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2019 (08:04 IST)

सासऱ्याची सुनेवर वाईट नजर त्याची विकृती केली मोबाईल मध्ये कैद

सख्या मुलाच्या पत्नीवरच अर्थात सुनेवारच वाईट नजर ठेवणाऱ्या ५० वर्षीय सासऱ्याला विरार पोलिसांनी ताब्बेयात घेतले आहे. या पिडीत महिलेने याबद्दल अनेकदा  नवऱ्याकडे त्याच्या वडिलांचे वागणे चांगले नाही अशी तक्रार केली होती. जेव्हा नवऱ्याने तिच्यावर विश्वास ठेवायला नकार दिला होता. तेव्हा तिने आरोपीच्या कृती कॅमेऱ्यात कैद करण्याचा निर्णय घेतला. एका इंग्रजी वृत्त पत्राने ही बातमी दिली आहे. सासरा आरोपी हा रिक्षाचालक आहे. सासरा नेहमी स्वयंपाकघरात आपल्या सूनेचा विनयभंग करत होता, सासऱ्याच्या वर्तनाचे चित्रीकरण करण्यासाठी तिने स्वयंपाकघरात योग्य ठिकाणी मोबाइल फोनचा कॅमेरा सुरु केला. ही महिला किचन मध्ये काम करत होती तेव्हा सासरा तिथे आला व त्याने नको त्या ठिकाणी स्पर्श केला. त्याचे हे सर्व वर्तन कॅमेऱ्यात कैद झाले. तिचा नवरा घरी आल्यानंतर तिने त्याला ती क्लिप दाखवली. मुलाने याबद्दल जेव्हा त्याच्या वडिलांना जाब विचारला तेव्हा त्यांनी दोघांना घर सोडून जा असे सांगितले. या घृणास्पद प्रकारा नंतर महिलेने त्यानंतर विरार पोलीस स्थानकात जाऊन सासऱ्याविरोधात एफआयआर नोंदवला. आम्ही आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले.