सोमवार, 11 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2023 (17:36 IST)

नवी मुंबई विमानतळतळाची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कडून हवाई पाहणी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाची हवाई पाहणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडून झाली. या विमान तळामुळे मुंबई विमानतळाचा भार कमी होण्याचे विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी रन-वे आणि टर्मिनल्सच्या इमारतीची पाहणी केली. या विमानतळाच्या कामाला 2017 साली पासून सुरुवात झाली. हा विमानतळ 2024 पर्यंत खुला करण्यात येईल असा विश्वास या वेळी मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त करण्यात आला. मुंबई विमानतळाचा भार कमी होणार.असे मुख्यमंत्री प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले. नवी मुंबईचे हे विमानतळ पुणे, गोवा आणि राज्यासाठी महत्त्वाचे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे भूमिपूजन चे कार्य झाले होते. समृद्धी एमटीएचएल या सह नवी मुंबई विमानतळाचा शुभारंभ पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. विमानतळाच्या पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.या विमानतळामुळे मुंबई विमानतळाचे भार कमी होईल असे ते म्हणाले. हा विमानतळ 2024 डिसेंबर पर्यंत खुला करण्यात येईल असे ते म्हणाले. 
 
राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी हेलिकॉप्टरने या विमानतळाची पाहणी केली. ट्रान्स हार्बर लिंकमुळे या विमानतळाला कनेक्टिव्हीटी मिळेल. तसेच कोस्टल रोड, आणि मेट्रो ने हे विमानतळ जोडले जाणार. तसेच हा विमानतळ एक मल्टीमॉडेल देखील असणार अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 
Edited by - Priya Dixit