बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 जुलै 2019 (16:19 IST)

मृत्यू नंतर सुनेने व मुलीने दिला खांदा

यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावातील विठ्ठल रामचंद्र हरडे यांचे  निधन झाले. मात्र रिवाजानुसार पुरुषांनी अथवा मुलांनी त्यांना खांदा दिला नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारात तिरडीला त्यांच्या मुलीने व सुनेने खांदा देऊन परंपरेला फाटा देत अग्नी संस्कारही केला आहे. विठ्ठल रामचंद्र हरडे हे तरोडा गावातील एक धार्मिक व परिवर्तनवादी व्यक्ती म्हणून परिचित होते. त्यामुळेच त्यांच्या घरात पूर्वीपासूनच आधुनिक विचाराचे वातावरण होते. तसेच घरातील मोठे बंधू मोहन हरडे यांचा मराठा सेवा संघ या चळवळीशी जवळचा संपर्क होता. आयातूनच त्यांचे कुटुंब आधुनिक व परिवर्तनवादी विचाराने वागत आहे. मृत्यूनंतर अंत्यसंस्काराकरिता तिरडीला खांदा देण्याची वेळ आली, तेव्हा मुलाप्रमाणे मुलीनेही आपल्या वडिलांना खांदा दिला. यात त्यांची मुलगी शारदा घोटेकर, लता वरपटकर, मंजुषा हरडे, सुरेखा हरडे, सिंधू काकडे, शांता बलकी, बेबी झाडे, कुंता गायकवाड यांचा समावेश होता.