शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (22:05 IST)

माझ्या उत्तरानंतर दूध का दूध, पानी का पानी होईल : दिलीप वळसे-पाटील

dilip walse patil
माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती केली. त्यामुळे उद्या सभगृहात उत्तर देईन, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील  यांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी ते म्हणाले उद्या माझ्या उत्तरानंतर दूध का दूध, पानी का पानी होईल. करारा जवाब मिलेगा, असे ठणकावून त्यांनी सांगितले. 
 
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर आज विधानसभेत गृहमंत्री वळसे-पाटील उत्तर देणार होते. सभागृहात विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर आज उत्तर देणार होतो. त्यासाठी तयार होतो. पण त्यांनी मागणी केली होती की उद्या बोला. त्यामुळे मी उद्या उत्तर देईल. त्यांनी खरेतर कायदा सुवस्था यावर बोलायचे होते. पण ते त्यांच्या कर्तव्यापासून दूर गेले आहेत, अशी टीका गृहमंत्र्यांनी यावेळी केली.