रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (15:13 IST)

टीईटी घोटाळा : नाशिक विभागात सर्वाधिक अपात्रांना केले पात्र

टीईटी परीक्षा घोटाळ्याचे नाशिक कनेक्शनही समोर आले आहे. नाशिक विभागातून सर्वाधिक अपात्रांना पात्र केल्याची  माहिती समोर आली आहे. नव्या माहितीनुसार नाशिक विभागात सर्वाधिक ०२ हजार ७७० पात्रांना पात्र केल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मध्ये जी ए सॉफ्टवेअर प्रितेश देशमुख यांनी संगनमत करून ०७ हजार ८८० अपात्र परीक्षार्थींची पैसे घेऊन त्यांना पात्र केले होते. त्यातील एजंट कडील ११२६ अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे
 
त्याबरोबर या ०७ हजार ८८० अपात्रांपैकी सर्वाधिक २ हजार ७७० अपात्र परीक्षार्थी नाशिक विभागातील असल्याचे आढळले आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी एकास अटक केली असून मुकुंद जगन्नाथ जोशी असे या संशयिताचे नाव आहे. सूर्यवंशी याला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ मार्चपर्यंत दिवसांची कोठडी देखील सुनावली आहे. सूर्यवंशी हा शिक्षक असून यातील आरोपी राजेंद्र सोडून किंवा मुकुंदा सूर्यवंशी या दोघी एकाच गावचे राहणारे आहेत.
 
ही परीक्षा २०१९-२० मधील अंतिम निकालात १६ हजार ६०५ परीक्षार्थींना पात्र गेले होते. त्यापैकी ७८०० अपात्र परीक्षार्थी कडून एजंट मार्फत पैसे घेऊन त्यांना पास करण्यात आले आहे. त्यापैकी नाशिक विभागातील अपात्र परीक्षार्थींना पात्र करणाऱ्यांची संख्या दोन हजार ७७० असून ती इतर विभागांच्या तुलनेत जास्त असल्याचे निष्पन्न झाले आहे.