सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (15:02 IST)

उमदीत टोळी युद्ध, दोघांचा खून, एक चिंताजनक

सांगलीतील जत तालुक्याच्या उमदी येथे दोन टोळी युद्धाचा मंगळवारी रात्री भडका उडाला. या भडक्याने दोन तरुणांचा बळी घेतला आहे. दोघा तरुणांना धारधार शत्राने वार करून निर्घृण खून करण्यात आले. तर एक जण गंभीर जखमी असून त्याचीही प्रकृती चिंताजनक बनली आहे. उमदी पंढरपूर मार्गावर हा थरार घडला आहे. या दुहेरी खुनाच्या घटनेने जत तालुका हादरला आहे. या प्रकरणी संशयित 12 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
मदगोंडा नागा बगली (वय 24) व संतोष राजू माळी (वय 23) रा.उमदी अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर प्रकाश मल्लिकार्जून परगोंड (वय 22) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस अधिक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट दिली आहे. उमदी येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील वादातून आणि पूर्वैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून जत येथील एका टोळीचा म्होरक्या, उमदी येथील सहकारी तसेच उमदी येथील एक टोळी यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. त्याची किनार या घटनेला असल्याचे सांगण्यात येत आहे.