सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (11:36 IST)

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचा मोर्चा

राष्ट्रवादीचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राज्यातील भाजप आक्रमक झाले असून नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी वारंवार केली जात आहे. राज्यातील भाजप नेत्यांकडून ही मागणी केली जात आहे. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असून यात राज्यभरातील भाजपाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
 
आंदोलनात सहभागी होण्यासाठी नाशिकचे कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. आझाद मैदानात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. आझाद मैदान नाही तर संपूर्ण मुंबईभर असे शेकडो बॅनर्स भाजपकडून लावण्यात आले आहेत.
 
नवाब मलिक यांना २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांची रिमांडमधील चौकशी पूर्ण झाल्याची माहिती ईडीने PMLA कोर्टामध्ये दिली आहे.